‘आशा कर्मचाऱ्यांना किमान १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना किमान २२ हजार रुपये मानधन द्यावे, शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, भत्ते वाढवून द्यावे, आदी विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, सिटूचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे, सुवर्णा रेवले, आशा मुंडे, मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे, रेखा वाघमारे, सुरेखा भिसे, सुलताना तांबोळी, सत्यभामा सुरवसे, खाजाजी शेख, सुषमा साखरे, मंगल गीत्ते, संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदूबाई कुकर, सुमित्रा पवार, हेमा काळे, अनिता गिराम, सुरेखा फड, मंजुषा बिक्कड, सुनिता काळे, गौळण मोरे, दीपमाला रोडे, अर्चना पोले, सुनिता राठोड, वर्षा कोकाटे, सुनीता मुंडे, मीरा स्वामी, उमा वाघमारे, अनिता चाटे, सुनीता होलंबे, लता अघाव आदींसह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी होते.
आशा, गटप्रवर्तकांची परळीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST