चिंचाळा (बीड) : नवी दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या परेडसाठी मुळची वडवणी तालुक्यातील देवडी येथील दामिनी देशमुख हिची परेड कमांडर म्हणून निवड झाली.
दामिनी एअरफोर्समध्ये पायलट म्हणून गेल्या पाच वर्षांपासून देशसेवा करीत आहे. परेडसाठी कमांडर म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळण्याचा बहुमान तिला आहे. दामिनीचे वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. दामिनीचे शिक्षण पुणे येथे झालेले आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर २०१९ मध्ये देशपातळीवरील कॉमन ॲडमिनिस्ट्रेट या खडतर परीक्षेत देशभरातील दीड लाख उमेदवारांमधून ती गुणवत्ता यादीत आली. तिची एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर परेडसाठी तिची परेड कमांडर म्हणून निवड झाली. याबद्दल देवडी येथील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.