यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, सत्कारमूर्ती नितीन शेटे, वर्षा नितीन शेटे, तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ. शरदराव हेबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सागा फिल्म फाऊंडेशन समाजसेवा संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. बहुआयामी, बहुगुणी, समाजातील वंचित, उपेक्षित लोकांसाठी नितीन शेटे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याची नोंद घेऊन या पुरस्कारासाठी शेटे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर म्हणाले की, नितीन शेटे यांचा सत्कार म्हणजे संस्थेचा सत्कार आहे. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत संस्थेला प्रगतीपथाकडे नेले. संस्थेची धुरा हाती आल्यापासून पूर्णपणे झोकून देऊन त्यांनी काम केले आहे. सत्काराला उत्तर देताना कार्यवाह नितीन शेटे म्हणाले की, संस्थेच्या याआधीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मार्गदर्शकांनी संस्थेला योग्य दिशेने नेण्याचे कार्य केले. संस्थेने मागील ६५ वर्षांत अनेक समाजाभिमुख कार्य केले आहे. आगामी काळातही अशीच अनेक आव्हाने स्वीकारून आपण कार्य करत राहू व त्या आव्हानांना सामोरे जाऊ, असे नितीन शेटे म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शरदराव हेबाळकर यांनी सांगितले की, स्वयंसेवक असणे ही संस्थेची ओळख आहे. स्वयंसेवक म्हणून काम करताना संघाच्या कार्याला बाधा येणार नाही, एवढेच पथ्य पाळावे लागते. जे योग्य आहे, तेच करणे हेच पथ्य होय. असे पुरस्कार जेेव्हा मिळतात, तेव्हा तुमच्याकडून आणखी काही अपेक्षा असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी, तर आभार अॅड. मकरंद पत्की यांनी मानले. या पारिवारिक कार्यक्रमास शैला आलुरकर, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, कोषाध्यक्ष विकासराव डुबे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विष्णू सोनवणे, विजय चाटुपळे, शिक्षक प्रतिनिधी आप्पाराव यादव, शरयु हेबाळकर, डाॅ. अतुल देशपांडे, अमरनाथ खुर्पे, प्रभारी प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, प्राचार्य ज्ञानेश्वरी वाघ, मुख्याध्यापक निवृत्ती दराडे, मुख्याध्यापिका ज. ह. राठोड, प्रगती विभागप्रमुख वर्षात मुंडे, नभा वालवडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांचा अंबाजोगाई येथे खोलेश्वर शैक्षणिक संकुलात सपत्नीक विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, सत्कारमूर्ती नितीन शेटे, वर्षा नितीन शेटे, डॉ. शरदराव हेबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
===Photopath===
060321\06bed_4_06032021_14.jpg