शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलपूरवाडी-आष्टी लोहमार्गावर बुधवार, गुरुवारी धावणार हायस्पीड रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 11:37 IST

२९ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे.

- नितीन कांबळेकडा (जि.बीड) : बीड जिल्हावासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गापैकी नगर ते आष्टी मार्गावरील काम पूर्ण झाले आहे. सोलापूरवाडी ते आष्टी नवीन रेल्वेमार्गावर जलदगती चाचणी करण्यासाठी २९ व ३० डिसेंबर रोजी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. या लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून प्रशासन पातळीवर तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सोलपूरवाडी ते आष्टी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून २९ व ३० डिसेंबर रोजी जलदगती चाचणी होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. पिंपळा, कुंटफळ, कुंभेफळ, चिंचोली, धानोरा, साबलखेड, कडा, शेरी, जळगाव मांडवा, कासारी, राधापूर व आष्टी येथील तलाठी, सरपंच, मंडलाधिकारी, ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर लोंकानी थांबू नये, आपली जनावरे बांधू नयेत, आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यअभियंता (निर्माण) मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तशी कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे आष्टी, अंभोरा यांना देण्यात आली आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावरनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत नगर ते आष्टी या ६४ किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. नगर-आष्टी या मार्गावर ताशी १४४ किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी करण्यात येणार होती. २९ व ३० डिसेंबरला ही चाचणी होणार असल्याचे मध्य रेल्वे विभागाने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. नगर-बीड रेल्वेमार्गासाठी अंदाजे २ हजार ८२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी ९० कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीBeedबीडAhmednagarअहमदनगर