शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी- ना. धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 20:35 IST

मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड- मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासोबतच वीजबिल कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.तीन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मुंडे यांनी आज काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. आज दुपारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. मात्र या मदतीला ना. धनंजय मुंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये शेतकर्‍यांवर अशाच प्रकारचे संकट आले होते. तेव्हाच्या आघाडी सरकारने शेतकर्‍यांना प्रचलित मदतीसोबतच विशेष पॅकेज दिले होते. त्याच धर्तीवर सरकारने आपतग्रस्त शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी.2014 मध्ये  200 कोटी रुपयांचे लाईट बिल माफ केले होते. जवळपास 265 कोटी रुपयांचे कर्जावरील व्याज माफ केले होते, पीक कर्ज वसुलीस मुदतवाढ व सक्तीने कर्जवसुली करू नये, असे आदेश दिले होते. याची आठवण करून देतानाच त्या वेळचा 20 मार्च 2014 चा शासन निर्णयही ट्विट करून शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. 2014 प्रमाणे यावेळेसचे नुकसानही अतिशय मोठे असल्याने सरकारने एनडीआरएफचे निकष अधिक पॅकेजमधील रक्कम मिळून कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, वीजबिल माफ करावे, शेती कर्जाचे व्याज माफ करावे, पिक कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. आज सरकारने जाहिर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी व शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. त्यातही शेतकर्‍यांना केंद्राच्या मदतीची वाट पहावी लागणार आहे. विशेष पॅकेज देणे, विज बील माफ करणे, या गोष्टी राज्य सरकारच्या हातात असल्याने तातडीने त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे