शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:51 IST

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. हे सर्व परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले ...

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. हे सर्व परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले आहेत. सोमवारी पहाटे परळी व नेकनूरमध्ये सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील सहा दरोडेखोर रविवारी रात्री बसने परळीला आले. येथून रिक्षाने अंबाजोगाईला गेले. तिथे एका ठिकाणी जीप चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु हॉर्न वाजल्याने परिसरातील नागरिक जागे झाले अन् त्यांचा प्रयत्न फसला. पुढे प्रशांतनगर भागात जाऊन त्यांनी कार (एमएच १३ एसी ५६१०) चोरली. या कारमधूनच दरोडा टाकण्यासाठी ते घर शोधत होते. एवढ्यात अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे गस्त घालताना त्यांना आडवे गेले. मुंडे यांनी कारला हात दाखवला.

पोलिसांना पाहून कार सुसाट धर्मापुरी मार्गे घाटनांदूरकडे गेली. येथे रेल्वे ट्रॅकवर कार थांबवून सहा दरोडेखोरांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली अन् अंधाराचा फायदा घेत ते बाजूच्या शेतातून परळी रोडवर आले. येथे एका रिक्षात बसून ते परळीकडे निघाले. रस्त्यात महामार्ग पोलिसांनी अडवले. यावेळी त्यांनी नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असल्याची बतावणी दिली अन् निघून गेले.

पाठीमागे अंबाजोगाई शहर व ग्रामीण तसेच परळी शहर व ग्रामीण, आरसीपी असा सर्व फोर्स परळीकडे गेला. येथे बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात तपासणी केली. यावेळी वर्दीवर असलेल्या पोलिसांना पाहून हे सहाही दरोडेखोर येथून पळाले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन यातील करनसिंग गगनसिंग टाक (रा. साकला, जि. परभणी) याला पकडले. इतर दरोडेखोर मात्र बाजूला असलेल्या जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पाऊस व घनदाट झाडीमुळे दरोडेखोर शोधण्यात पोलिसांना अडथळे आले. उशिरापर्यंत शोध मोहीम हाती घेतली मात्र पोलिसांना यश आले नाही. असे असले तरी परभणीच्या दरोडेखोरांचा अंबाजोगाईत आखलेला प्लॅन पोलिसांच्या गस्तीमुळे अयशस्वी ठरला.अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे व त्यांचे टीम, अंबाजोगाई ग्रामीण व शहर, परळी ग्रामीण व शहर या पोलिसांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.

कारमध्ये आढळली चोरलेली दोन डुकरेदरोडेखोरांनी अंबाजोगाईत दोन डुकरेही चोरांनी कारमध्ये डांबली होती. घाटनांदूरमध्ये कार सोडून पळाल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत हा प्रकार समोर आला. कारमध्ये आढळलेल्या पासबुकावरुन ती अंबाजोगाईतील असल्याचे समजले.जामखेडपासून पाठलाग करून महाजनवाडीमध्ये पाच दरोडेखोर जेरबंदजामखेडमार्गे बीड जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी नऊ जणांची टोळी येत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे दरोडा प्रतिबंधक पथकाने नेकनूर पोलिसांच्या मदतीने जामखेडपासून पाठलाग केला. बीड तालुक्यातील महाजनवाडी परिसरात सापळा लावला. तीन दुचाकींवरुन नऊ जण येत असल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घातली. यावेळी त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडा प्रतिबंधक, नेकनूर पोलीस व आरसीपीच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करुन नऊपैकी पाचजणांना अटक केली. यामध्ये योगेश विष्णू पवार (३०, अहमदनगर), शहादेव राजाभाऊ चादर (३०, क्रांतीनगर, पाटोदा), आकाश अशोक चव्हाण (२४, मुकींदपूर, अहमदनगर), राहुल शाम काळे (२५, हर्सूल तलावाजवळ, औरंगाबाद), भूपेंद्र महावीर सहानी (रा. मुज्जफरपूर, बिहार) यांचा आरोपीत समावेश आहे. इतर चौघे पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याकडून तीन दुचाकी, तीन मोबाईल, रोख सहा हजार रुपये, दरोड्यासाठी लागणारे साहित्य, धारदार शस्त्रे जप्त केली. त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा थरार घडला.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, सपोनि गजानन जाधव, पोउपनि वाटोरे, भारत माने, मुंजाबा सौंदरमल, राजाभाऊ नागरगोजे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, हरिभाऊ बांगर, अशोक दुबाले, भारत बंड, राहुल शिंदे, चालक साबळे, सोनवणे, डोंगरे, गौतम वाघमारे, महेश अधटराव, ढाकणे, काळे, बागवान, यादव यांनी केली.

टॅग्स :BeedबीडRobberyदरोडाMarathwadaमराठवाडाCrimeगुन्हा