शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार-रिक्षाची जोरदार धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:03 IST

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार ...

ठळक मुद्देतीन गंभीर जखमी। कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील मादळमोहीची घटना

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कार चालकासह सर्वचजण फरार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मादळमोही पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मादळमोही हे बाजारपेठेचे गाव आहे. येथून अ‍ॅपेरिक्षा (एम.एच.२० यु.४१५७) हा प्रवासी घेऊन पाडळसिंगीकडे निघाला होता. एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या कार (एम.एच.२१ ए.एक्स.५३०३) ने रिक्षाला जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेने रिक्षा महामार्गाच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक असिफ शेख (रा. मादळमोही) व सुनिल शिंगाडे (रा. शिंगारवाडी ता. गेवराई) हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षामधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मादळमोहीच्या ग्रास्थांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघात घडताच कार तेथेच सोडून कारचालक व इतरांनी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.अपघातांची संख्या वाढलीकल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत अनेक छोटी-छोटी गावे, वाड्या वस्त्या आहेत. त्याठिकाणी परिवहन महामंडळाची बस जात नाही. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे या गावांमधील नारिकांना खासगी रिक्षातून प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्ग असल्यामुळे इतर वाहनांचा वेग हा कायम वाढलेला असतो. त्यामुळे मागील वर्षात रिक्षा व इतर वाहनांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अपघात होण्याची नेमकी कारणं शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, महामार्गाशी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू