शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 03:48 IST

मुसळधार पाऊस, जोरदार प्रवाह आणि अंधार यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण

बीड: जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री दोन वाजता एक जीप पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरु करत लोक अडकलेल्या झाडापर्यंत दोरीच्या साहाय्याने पोहचण्यात यश मिळवले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जीपमध्ये एकूण सहा लोक प्रवास करत होते. त्यापैकी तिघांनी योग्य वेळी जीपमधून उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका शेवरीच्या झाडावर चढून आपला जीव वाचवला. झाडावरून मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वतः पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. पहाटे तीन वाजेपर्यंत प्रयत्न सुरू राहिले. मात्र मुसळधार पाऊस, जोरदार प्रवाह आणि अंधार यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण निर्माण झाली. उर्वरित लोकांचा शोध घेण्यासाठी पोलिस व स्थानिकांनी मिळून शर्थीचे प्रयत्न केले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक सतत नदी-नाल्यांच्या पाण्याच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण भागात काही घरांना पाणी शिरल्याचे वृत्त आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

आपत्ती व्यवस्थापन नाहीच!

पूरस्थिती निर्माण होऊनही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी कुठेही दिसून आले नाही. पोलिसांवरच बचावकार्याची जबाबदारी पडली, स्थानिक प्रशासन पूर्णतः निष्क्रिय असल्याची भावना. वेळेत मदत मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पूर आला तरी सरकारी आपत्ती विभाग केवळ कागदावरच" अशी बोचरी टीका ग्रामस्थ करत आहेत.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस