शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
3
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
4
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
5
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
6
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
7
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
8
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
9
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
10
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
11
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
12
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
13
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
14
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
15
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले
18
या ‘गुरुजीं’ची गय नको! विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोठडीत पाठवलं पाहिजे
19
निवडणूक आयोगाचे भाजपशी साटेलोटे, घ्या पुरावा! 'तो' विचित्र आदेशच संगनमत उघड करतो
20
आर्थिक राजधानीतही ‘ती’चा छळ थांबेना, जाच काही संपेना; ९ महिन्यांत २१ जणींनी संपविले आयुष्य
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्याने हैराण दाम्पत्य छ्तावर झोपले; खाली चोरट्यांनी घर साफ केले, ७ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:43 IST

चोरट्यांच्या काही वस्तू घटनास्थळावर विसरल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी चोरटे परत आले होते.

दिंद्रुड (बीड) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत मंगळवारी मध्यरात्री जबरी चोरीचे घटना घडली. सोने-चांदी व नगदी रोकड असा साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला .सविस्तर वृत्त असे की, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड नजदीक असलेले पिंपळगाव (ना.)या गावातील माणिकराव मायकर व पुष्पा माणिकराव मायकर यांच्या घरी केवळ वयोवृद्ध पती-पत्नी राहतात. उकाड्याचे दिवस असल्याने हे दांपत्य छतावर झोपण्यास गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी स्वयंपाक घरातून आत प्रवेश केला. घरातील कपाट तोडून तिजोरीत असलेले तीन लाख व अन्यत्र ठेवलेले दीड लाख असे साडेचार लाखांची रोकड, कपाटातील जवळपास एक किलो चांदीचे दागिने व पाच तोळ्याचा सोन्याचा ऐवज असा, जवळपास साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मायकर दांपत्याने दिली. दरम्यान, चोरटे घरातून पळत असताना काही गावकऱ्यांनी बघितले. तीन चोर मोटरसायकलवर फरार झाल्याचे  गावकऱ्यांनी पाहिले. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठस्से व श्वान पथक बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

अन् चोरटे आले परतमंगळवारी मध्यरात्री चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या काही वस्तू घटनास्थळावर विसरल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी चोरटे परत फिरले मात्र योगायोगाने पाऊस पडण्यास सुरुवात झाली व मायकर दांपत्य छतावरून खाली आले. चोरी झाल्याची त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केला, त्यामुळे चोरट्यांना वस्तू न घेता पलायन करावे लागले. याच वेळी काही ग्रामस्थांनी त्यांना बघून दगडफेक सुरू केली.चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले असल्याची माहिती पिंपळगाव ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड