शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक ! पंचमीसाठी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना पित्यासह जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:18 IST

शुक्रवारी सकाळी गावातील नागरिकांना नदीच्या पुलाजवळ दुचाकी दिसली. त्यामुळे वाहून गेल्याचा संशय वाढला.

ठळक मुद्देलेकरांना मामाच्या गावाला जायचे राहून केले पंचमीसाठी मामाच्या गावी वडिलांसोबत दुचाकीने जात होते भावंड.

गेवराई (जि. बीड ) : पंचमीच्या सणासाठी लेकरांना मामाच्या गावी घेऊन जाणाऱ्या पित्यासह दोन्ही मुलांना जलसमाधी मिळाली. गुरुवारी रात्री तालुक्यातील अमृता नदीच्या पुरात तिघे दुचाकीसह वाहून गेले. शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह सापडला असून मुलगा आणि वडिलांचा शोध सायंकाळपर्यंत सुरु होता. कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३०), प्रथमेश (८) आणि वैष्णवी कृष्णा घोरपडे (६) अशी जलसमाधी मिळालेल्या तिघांची नावे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३०) हे दुचाकीवरुन त्यांचा मुलगा प्रथमेश (८) आणि मुलगी वैष्णवी (६) यांना पंचमीच्या सणासाठी गुरुवारी गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील मामाकडे घेऊन जात होते. या मार्गावरील चकलांबा, मांडोळ, रसुलाबाद, पौळाची वाडी परिसरात  रात्री ८ वाजेच्या सुमारास या भागात जोरदार पाऊस झाल्याने पौळाचीवाडी येथून वाहणाऱ्या अमृता नदीला पूर आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील तिघे वाहून गेले.  

मुलीचा मृतदेह सापडला; दोघांचा शोध सुरु शुक्रवारी सकाळी गावातील नागरिकांना नदीच्या पुलाजवळ दुचाकी दिसली. त्यामुळे वाहून गेल्याचा संशय वाढला. पोलीस, महसूल यंत्रणेला कळवून शोधमोहीम सुरु केली असता नदी पात्रात काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला. तर वाहून गेलेल्या दोघांना शोधण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी गेवराई, बीड येथील अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तसेच  चकलांबा  ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय देशमुख, उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे, तलाठी, मंडळ अधिकारी घटनास्थळी होते. तर गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसDeathमृत्यू