शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची साईट हॅक? बदल्यांची खोटी यादी व्हायरल अन् १२६२ डॉक्टरांचा वाढला 'बीपी'

By सोमनाथ खताळ | Updated: June 10, 2023 16:30 IST

आरोग्य विभागाकडून हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला जात आहे

बीड : वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच आता आरोग्य विभागाची वेबसाईटच हॅक झाल्याचा संशय आहे. कारण शनिवारी पहाटेच्या सुमारास २०५ पानांवर १२६२ डॉक्टरांच्या बदल्या पडल्या. यात अनेकांची नावे उडाली तर काहींना दोन ठिकाणी पोस्टींग देण्यात आली. हा गोंधळ उडाल्यानंतर डॉक्टरांनी तक्रारी केल्या. त्यानंतर आरोग्य विभागानेच वेबसाईटवर कोणीतरी 'बेईमानी' केल्याचा खुलासा केला आहे. याबाबत तक्रार देणार असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील शासकीय डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. मे महिन्यापासूनच याची प्रक्रिया सुरू झाली होती. अगोदर ज्येष्ठतेनुसार यादी प्रकाशित करून त्यांच्याकडून आवडीचे ठिकाणे मागविण्यात आले. उपसंचालक कार्यालयांकडून याची छाननी करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. परंतू अनेकदा या प्रक्रियेत वेळेनुसार याद्या प्रकाशित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे डॉक्टर संतप्त झाले होते. ३१ मे पर्यंत बदल्या होणार अशी चर्चा असतानाच याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. असे असतानाच शनिवारी पहाटे २०५ पानांची यादी पडली. यात १२६२ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतू यातील त्रूटी पाहून काही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आयुक्तांनी याचा खुलासा करत 'काही बेईमान घटकांची अवैध कृत्य आहे' असे म्हणत खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांनीच मोकळा श्वास घेतला.

कही खुशी, कही गम..या बदल्यांच्या यादीत काही डॉक्टरांना मनासारखे ठिकाण मिळाले आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी झोपेतून उठण्याआधीच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. तर ज्यांची नावे नव्हती, अशांचा मात्र 'बीपी' वाढला होता. त्यांनी लगेच संचालक, आयुक्त कार्यालयात फोनाफोनी करून माहिती घेतली.

वेबसाईट हॅक झाल्याचा संशयआरोग्य विभागाकडून हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला जात असला तरी ही २०५ पानांची यादी 'ऑफिसरट्रॉन्सफर महा आरोग्य.कॉम' या साईटवरूनच डाऊनलोड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एक तर कंत्राटदाराची चुक आहे किंवा ही साईट कोणी तरी हॅक केल्याचा संशय आहे. याचा तपास करावा, अशी मागणीही डॉक्टर संघटनांकडून केला जात आहे.

रात्री उशिरापर्यंत ऑर्डर येऊ शकतेव्हायरल झालेली २०५ पानांची यादी खोटी आहे. कोणी तरी खोडसाळपणा केला आहे. याबाबत आम्ही एफआयआर करणार आहोत. बदल्या होणार आहेत, परंतू शनिवारी रात्री उशिरापर्यंत ऑर्डर पडू शकतात.- डॉ.स्वप्नील लाळे, संचालक, आरोग्य सेवा मुंबई

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडHealthआरोग्य