शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचेच ‘आरोग्य’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:28 IST

बीड : जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच निवासस्थानांची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी न झाल्याने दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाºयांना रहावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिका व आरोग्य विभागातील वरिष्ठांकडून मात्र याकडे ...

बीड : जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच निवासस्थानांची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी न झाल्याने दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाºयांना रहावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिका व आरोग्य विभागातील वरिष्ठांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या मध्ये जिल्हा रूग्णालयायातील कर्मचा-यांची शासकीय निवासस्थाने आहेत. शेकडो कर्मचारी येथे राहतात. २४ तास दुसºयांच्या आरोग्याची काळजी घेणाºया कर्मचाºयांचेच आता आरोग्य धोक्यात आल्याचे समोर आले आहे. या निवासस्थान परिसरात वेळेवर नाल्यांची सफाई पालिककेकडून केली जात नाही. तसेच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ड्रेनेज पाईपही फुटले असून मागील अनेक महिन्यांपासून त्याची दुरूस्ती झालेली नाही. विशेष म्हणजे आता कर्मचारीही तक्रार करून थकले असून त्यांनी वरिष्ठांकडे जाणेच कमी केल्याचे सांगण्यात आले.

एवढी गंभीर परिस्थिती असतानाही याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त होत आहे. येथील स्वच्छता करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील कर्मचाºयांमधून होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडMarathwadaमराठवाडा