शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांना दिले ‘हेल्थ कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:09 IST

अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा रुग्णालय : अतिताण, मधुमेह, हृदयविकाराच्या १३६१ रुग्णांवर उपचार; तपासणी करण्यासंदर्भात येणार मोबाईलवर संदेश

बीड : अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. आतापर्यंत १३६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. असंसर्गजन्य विविध आजार असलेल्या रुग्णांची आता नोंद होण्यास सुरूवात झाली आहे.मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिताण, ह्रदयविकार यासारख्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यापुर्वी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन याची माहिती देण्यात आली. याबाबत सर्वेक्षणही करण्यात आले होते. जिल्ह्यात सर्वच आरोग्य संस्थेत यावर उपचार होत असल्याने सामान्यांना मोठा फायदा होत आहे. हाच धागा पकडून २९ डिसेंबर २०१९ रोजीही जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष (बाह्यरुग्ण विभागात २ क्रमांकाच्या कक्षात) स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. यापूर्वी केवळ उपचार झाल्यानंतर वहिवर लिहून दिले जात होते. मात्र, आता त्यांना हेल्थ कार्ड दिले जात आहे.या कार्डवर नाव, गाव, संपर्क, आधार क्रमांक, व्यवसाय, रोगनिदान, ओपीडी नं., सांकेतिक क्रमांक लिहिला जातो. रुग्णाची संपूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर उपचारास सुरूवात होते. प्रत्येक महिन्याला त्यांना एकदा उपचारासाठी बोलावले जाते. याची सर्व नोंद हेल्थ कार्ड व रुग्णालय रजिस्टरमध्ये केली जात आहे. या प्रक्रियेमुळे असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांची माहिती सहज जमा करून त्यावर उपचार करणे सोपे होत आहे. याचा फायदा सामान्य रुग्णांना होत असून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत मुळे, डॉ.अक्षय भोपळे, डॉ.आशिष कोठारी, डॉ.अजय राख, परिचारिका भाग्यश्री कदम ही टिम रुग्णांवर उपचार करीत आहे.

असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांची तपासणी, उपचार करण्यासह समुपदेशन केले जाते. त्यांना हेल्थ कार्डही दिले जात आहे. यात सर्व माहिती असेल. रुग्णाने प्रत्येक वेळी उपचाराला येताना हे कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. विशेष कक्ष स्थापन केल्याने रुग्णांवर दर्जेदार उपचार होत आहेत.- डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्य