माजलगाव : एका विवाहित महिलेसोबत तिला लाज वाटेल, असे वर्तन करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना तालुक्यातील हिवरा येथे घडली. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार विष्णू बाबूराव रोमन (रा. गुंज, ता. घनसांवगी, जि. जालना) या युवकाने दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता पीडित महिला माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील शेतात आपल्या घरासमोर उभी होती. यावेळी विष्णू रोमन तिच्याजवळ आला व तिला लज्जा वाटेल असे वर्तन तिच्यासोबत केले. यावेळी रोमन याने तिच्या तोंडात चापट मारून तिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून पीडित महिलेने बुधवार, दि.३१ मार्च रोजी प्रत्यक्ष ठाण्यात हजर राहून आरोपी विष्णू बाबूराव रोमण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.