शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:41 IST

कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

अंबाजोगाई (बीड) : कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील  ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रमेशराव आडसकर, संजय दौंड, हनुमंतराव मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

सुरेश धस म्हणाले की, दर्जेदार व दुर्मिळ पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ही पुस्तके व ग्रंथ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचले तर अनेक प्रकारचे अज्ञान या माध्यमातून दूर होईल.  पुढे बोलताना ते म्हणाले की, समस्यांचा हुंदका हा साहित्याचा एक भाग आहे. राजकीय विचारधारेवर साहित्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं त्यामुळं साहित्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या या भरकटलेल्या पिढीला वाचन चळवळीतूनच प्रेरणा मिळेल. ग्रंथ हेच खरे गुरू असून प्रत्येकाच्या घराघरातील कापाटात पुस्तकांना प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली. 

संमेलनात मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या विविध प्रकाशकांचे ग्रंथ प्रदर्शन व ४५ विक्री केंदे्र लक्ष वेधत होती. सोमवारपर्यंत प्रदर्शन राहणार असून, दुर्मिळ ग्रंथ येथे उपलब्ध झाले आहेत.

सेल्फी स्थळ ठरले संमेलनाचे आकर्षणया संमेलनानिमित्त संमेलनस्थळी निर्माण करण्यात आलेले  ‘सेल्फी स्थळ’ गर्दी खेचून घेत आहे. संमेलनस्थळी ७ फुट उंचीचे हे स्थळ निर्माण करण्यात आलेला असून साहित्याचे प्रतिनिधित्व करणा-या पुस्तक, दौत, लेखणी आणि मोरपीस या साधनातून या सेल्फी स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ७ फुट उंचीचा हा ‘सेल्फी कट्टा’ संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकुंदराज कटटा आकर्षक ठरत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य