शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

हर हर महादेव, बम बम भोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:51 IST

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्यातिर्लिंंगापैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर, बीड शहरातील कनकालेश्वर, सोमेश्वर,पापनेश्वर, नीलकंठेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, जटाशंकर, मार्कंडेश्वर मंदिर तसेच चाकरवाडी, श्रीक्षेत्र कपिलधार, नारायणगडसह जिल्ह्यातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शिवालये गजबजली : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; विद्युत रोषणाईने मंदिरे उजळली

बीड : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्यातिर्लिंंगापैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर, बीड शहरातील कनकालेश्वर, सोमेश्वर,पापनेश्वर, नीलकंठेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, जटाशंकर, मार्कंडेश्वर मंदिर तसेच चाकरवाडी, श्रीक्षेत्र कपिलधार, नारायणगडसह जिल्ह्यातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. हर हर महादेव, बम बम भोले, जय भोलेनाथ आदी घोषणांनी शिवालयांचा परिसर दुमदुमला.

राजापूर येथे दर्शनासाठी गर्दीतलवाडा : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील शिवालयात तसेच गोदाकाठी वसलेल्या राजेश्वर व घाटावरील रामेश्वर या मंदिरात हजारो भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गंगेच्या पाण्याने स्नान करत भाविकांनी दर्शन घेतले. येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गावकऱ्यांकडून भाविकांना फराळासह फळांचे वाटप झाले. शनिवारी सांगता असून काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.तपोवन, गोवर्धनमध्ये गर्दीसिरसाळा: परळी - बीड या मुख्य मार्गवर सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या गोवर्धनच्या अजुर्नेश्वर तसेच तपोवनच्या तपेश्वर शिव मंदिरात सिरसाळ्यासह परिसरसतील ग्रामस्थांनी रांगा लावून शिस्तीत दर्शन घेतले. गावातील मानकरी यांच्या हस्ते महापूजा अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुले करण्यात आले. तसेच गोवर्धन येथील अजुर्नेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळाली. भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता.श्री सिध्देश्वर, कारीधारूर : तालुक्यातील कारी येथील पुरातन श्री सिध्देश्वर मंदिरात भाविक भक्तांनी श्री सिध्देश्वराचे दर्शन घेतले. तसेच येथे सुरू असलेल्या अखिल हरिनाम सप्ताह व श्री भागवत कथा याची सांगता शनिवारी प्रशांत महाराज खानापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर गावकºयांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.सोमेश्वर मंदिरात कीर्तनलोखंडी सावरगाव : येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी येथील शंकरराव धोंडीबा माने यांच्या शेतातील सोमेश्वर भगवान महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गणेश महाराज हंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर केशव महाराज शास्त्री (टाकळीकर) यांचे कीर्तन झाले. यावेळी नंदकिशोर मुंदडा, सरपंच सूर्यकांत माने, उद्धव पवार, महादेव हंगे, भारत माने, अप्पाराव तारकर, श्रीधर माने सह लोखंडी सावरगाव, कानडी वरपगाव, माकेगाव, सनगाव येथील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.अभोरा येथे कीर्तनअंभोरा : आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे अंखड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अक्रूर महाराज साखरे शेवगाव याचे कीर्तन झाले. याप्रसंगी वाघळूज, धानोरा सुलेमान, देवळा, आठवड, सालेवडगाव, हिवरा, पिंपरखेड, नांदूर या परिसरातील भाविक उपस्थित होते.राजा हरिश्चंद्राच्या दर्शनाला गर्दीवडवणी : महाशिवरात्रीनिमित्त देशातील एकमेव राजा हरिश्चंद्र देवस्थानावर दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता. गुरूवारी रात्री १२ वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपºयाºयातील भाविकांनी रांगेत थांबून शांततेत मनोभावे दर्शन घेतले. बेल व पुष्पहार अर्पण केले. पहाटेपासून दुपारपर्यंत मोठ्या रांगा होत्या. हर हर महादेव, राजा हरिश्चंद्र महाराज की जय या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुले होते. मंदिर परिसरात पोलिसांचा दगडा बंदोबस्त होता. यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. शनिवारी मठाधिपती भगवान महाराज राजपूत यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

टॅग्स :BeedबीडMahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम