एक महिन्यात काम प्रत्यक्षात सुरू न झाल्यास हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा देण्यात आला. धारूर शहरासाठी सुजल निर्माण योजनेतून २२ कोटी रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला होता. आठ वर्षांपासून संथ गतीने हे काम होत असल्याने शिवसैनिकांनी मोर्चा काढला. या ठिकाणी नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी, मुख्यधिकारी नितीन बागूल यांनी शिवसैनिकांशी चर्चा करून न्यायालयाचे निर्देशानुसार नगरपरिषद एक महिन्यात सदरील योजनेचे काम सुरू करणार असल्याचे लेखी पत्र दिले. यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद,माजी तालुका प्रमुख विनायक ढगे,शहरप्रमुख बंडू शिनगारे,राजकुमार शेटे,बंडूबप्पा सावंत, अनंत चिंचाळकर,बाबा सराफ,बालाजी शिंदे,नितीन सद्दिवाल,सुनील भांबरे,संजय फावडे, संजय पंडीत,बाबा तिबोले आदी शिवसैनिक, शहरातील नागरिक उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर थांबला हलगीचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST