शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पैशावर निवडणुका झाल्या असत्या तर गुंड आणि उद्योजक सहज निवडून आले असते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:50 IST

परळी (बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी सांगायचे सदभावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणुका लढविता येऊ शकतात, दारू, पैसा आणि गुंडगर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणे अशक्य आहे असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. ' गांव तिथे विकास दौरा '  या उपक्रमाअंतर्गत त्या खोडवा सावरगाव येथे बोलत होत्या.  आज सकाळी ...

परळी (बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी सांगायचे सदभावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणुका लढविता येऊ शकतात, दारू, पैसा आणि गुंडगर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणे अशक्य आहे असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. ' गांव तिथे विकास दौरा '  या उपक्रमाअंतर्गत त्या खोडवा सावरगाव येथे बोलत होत्या.  

आज सकाळी धर्मापूरी जिल्हा परिषद गटातील खोडवा सावरगांव, दैठणा घाट, गुट्टेवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या कि, पैशावर निवडणूका झाल्या असत्या तर उद्योजक सुद्धा निवडून आले असते, गुंडसुद्धा सहज जिंकले असते. दाऊद इब्राहिम पळून न जाता सत्ताधारी झाला असता पण तसे होत नाही. निवडुन यायचे असेल तर जनतेचा विश्वास आणि प्रेम याची आवश्यकता असते. असे सांगून दारू पाजणारा पाहिजे का पाणी देणारा हवा याची निवड जनतेला करावी लागणार आहे असेही त्या म्हणाल्या.  यावेळी भाजपा नेते रत्नाकर गुट्टे, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, जेष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, राजेश गिते, परमेश्वर फड, प्रा. बिभीषण फड, प्रभाकर फड अरुण दहीफळे, विनायक गुट्टे रवी कांदे, अजय गित्ते, गोविंद मुंडे गणेश होलंबे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMLAआमदारElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा