शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीसाठी आलेले गुरुजी दिवसभर ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:54 IST

आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे लागले.

ठळक मुद्देसकाळपासून साहेबांची प्रतीक्षा : सायंकाळी शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे लागले.उच्च न्यायालयाचा निर्णय व शासनाच्या निर्देशानुसार बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले. दुसºया दिवशी या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी या शिक्षकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात ३ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली होती.सकाळपासून हे शिक्षक जिल्हा परिषदेत आले होते. मात्र दुपारी चार वाजेपर्यंत ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्रा. ) राजेश गायकवाड यांनी सुनावणी घेतली. कार्यमुक्त केल्यानंतर उपोषणार्थी शिक्षकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ३९ मुद्दे मांडले होते. या मुद्द्यांवर या वेळी शिक्षकांनी त्यांची बाजू मांडली.या मुद्द्यांवर झाली सुनावणीआंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बीडमध्ये रुजू होऊन ५ वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांना नियमित पगार सुरु आहे.सध्या जि. प. कडे १५३ जागा रिक्त आहेत. पुढील दोन वर्षात पदोन्नतीने व सेवानिवृत्तीने जवळपास ५०० ते ७०० जागा रिक्त होत आहेत. टप्प्या टप्प्याने रिक्त होणाºया जागा मुळ प्रवर्गास उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनात केली होती. सदोष बिंदू नामावली असताना कार्यमुक्तीची कारवाई करताना सर्व शिक्षकांना विश्वासात घेतले नाही. प्रगटनातील व प्रसिद्धीपत्रकातील तारीख, वेळ पुरेशी नसल्याने व तफावत असल्याने ही कारवाई एकतर्फी झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. १९९५-९६-९७ मध्ये तयार केलेल्या बिंदू नामावलीत वंजारी, धनगर, बंजारा समाजातील शिक्षक हे खुल्या प्रवर्गातून निवड झालेले असताना २०१४, २०१५, २०१६ व २०१८ या बिंदू नामावलीत काही शिक्षकांना एनटी प्रवर्गात दाखविले आहे. यात दुरुस्ती केलेली नाही.२०१३, २०१४ मध्ये अतिरिक्त शिक्षक होते तर २०१६ व २०१७ मध्ये दोन्ही वर्षात आॅनलाईन पद्धतीने शिक्षक बदली करुन आले ते यादीत नाहीत.सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बीड जि. प. मध्ये दाखल झाले, मग यात त्यांचा दोष काय? असे उपोषणार्थी शिक्षकांचे म्हणणे होते.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक