शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिरसदेवीत गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:42 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई देशी दारू, कारसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते.राष्टÑीय महामार्ग २२२ लगत असलेल्या हॉटेल शिवनेरी (ढाबा) शिरसदेवी (ता.गेवराई) येथे राम संदीपान कदम हा अवैधरीत्या देशी, विदेशी दारू चोरट्या पद्धतीने विक्री करतो, अशी बातमी मिळाल्यावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कर्मचाऱ्यांसह सदर ढाब्यावर धाड टाकली. यावेळी राम कदम हा सदर ठिकाणाहून पळून गेला. सदर ढाब्याची झडती घेतली असता तेथे देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने ठेवल्या असल्याचे निदर्शनास आले. ढाब्यासमोर पांढ-या रंगाची कार (एमएच १४ बीएक्स ५२४४) उभी असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची झडती घेतली त्याच्या डिकीत १८० मिलीच्या देशी दारुच्या संत्रा ब्रँडच्या ५० सीलबंद बाटल्या व १८० मिलीच्या ब्रँडीच्या ९ सीलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर ठिकाणी संशय बळावल्याने तसेच शिवनेरी ढाब्याचा चालक राम कदम हा फरार झाल्याने त्याच्या राहत्या घरी शोध घेऊन झडती घेतली असता घरात ६५० मिली क्षमतेच्या बिअरच्या ४४ बाटल्या मिळून आल्या. तसेच एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आरोपीच्या घरी मिळून आल्या. सर्व देशी, विदेशी दारू, बिअर, चारचाकी वाहन व देशी कट्टा असा एकूण ३ लाख २५ हजार ५४० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन राम कदम याच्याविरुद्ध महाराष्टÑ दारुबंदी कायदा १९४९ चे कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कदम याच्या घरातून जप्त करण्यात आलेली गावठी पिस्टल पुढील कार्यवाहीकरीता तलवाडा पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आलेली आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तपासात आश्रुबा गाडे याच्या शिरसदेवी येथील राहत्या घरी छापा मारला असता तेथून आश्रुबा गाडे व परमेश्वर जाधव यांच्या ताब्यातून विदेशी ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ७३ बाटल्या, व्हिस्की विदेशी ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ बाटल्या व व्होडकाच्या १८० मिली क्षमतेच्या २६ बाटल्या असा एकूण २९ हजार ७८८ रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. या दोघांविरुद्ध महाराष्टÑ दारुबंदी कायदा १९४९ चे कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, महाराष्टÑ राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा आरोपींनी कुठून आणला याबाबत अधिक तपास सुरू आहे. अवैध व बनावट दारु विक्री करणा-या इसमांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवून महसूल संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले.
टॅग्स :BeedबीडraidधाडBeed policeबीड पोलीस