शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

दु:खाची काजळी विसरून जीवनात रंग भरण्यासाठी टाकतात गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:22 IST

मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे.

- अनिल भंडारी बीड : मनभेद, मतभेद विसरत रंगांची उधळण करीत होळीचा सण सर्वत्र आनंद आणि जल्लोषात साजरा केला जातो. मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे. यंदा कोरोनामुळे अडचणी असल्यातरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत यंदाच्या धुलिवंदनाला साधेपणाने रंग भरले जाणार आहेत. व्यापार, उद्याेगासाठी मागील ६०-६५ वर्षांपासून सिंधी पंजाबी समाज इथल्या मातीत मिसळला आहे. सर्वधर्मीय सण , उत्सवात सहभागी होणाऱ्या सिंधी- पंजाबी बांधवांनी आपल्या समाजाची परंपरादेखील जपली आहे.  शहरात या समाजाची ५० ते ६० घरे असून लोकसंख्या ७०० च्या घरात आहे. येथील गुरूनानक दरबारात समाजाचे सर्व उपक्रम, जयंती, उत्सव तसेच इतर कार्यक्रम एकोप्याने पार पडतात. वर्षभरात ज्यांच्या घरी दु:ख झाले,  घरातील व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन किंवा सामुदायिक कार्यक्रमात बोलावून या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली जाते. नंतर त्या कुटुंबीयांवर गुलाल टाकून आनंदात सहभागी होण्यासाठी विनवणी केली जाते. त्यानंतर हे कुटुंब समाजातील सर्व प्रसंगात सहभागी होतात, असा रीतीरिवाज आहे. बीड शहरामध्ये गेल्या  २५ वर्षांपासून हा रिवाज पाळला  जातो. 

टॅग्स :Beedबीड