शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:28 IST

आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले.

ठळक मुद्देशासकीय टँकरने शेततळ्याला पाणीपुरवठा : चौकशीनंतर बजावली ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस

कडा :आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. याबाबत लोकमतने बुधवारच्या अंकात ‘शासकीय टँकरने शेततळ्याला पाणीपुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच बुधवारी सकाळपासून गटविकास अधिकारी मेहकरी तलावावर चौकशीसाठी जाऊन आले. अखेर नागरिकांना पिण्याऐवजी शेततळ्याला पाणी देणाऱ्या त्या टँकरचा शोध लावत संबंधित ग्रामसेवकाला नोटीस बजावली. आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील हिवरा रोडलगत असलेल्या गाडे वस्तीकडे जाणारे एक टॅँकर चक्क शेततलावात पाणी सोडताना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिसून आले. सदर टॅँकर शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील पंचायत समितीचे होते. ही बाब चर्चेत आल्यानंतर खळबळ उडाली.लोकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेले टँकर अशा प्रकारे आर्थिक हितसंबंध ठेऊन दिशाभूल करत आहेत. गावोगाव खेपा वेळेवर होत नाहीत असे प्रकार घडत असल्याबाबत लोकमतने वृत्त दिले होते.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित टॅँकरचालक आणि पाठबळ देणाºया अधिकाºयावर कारवाईच मागणी या वृत्तामध्ये करण्यात आली होती. हे वृत्त प्रकाशित होताच बुधवारी गटविकास अधिकारी मेहकरी येथील उद्भवाच्या ठिकाणी जाऊन आले.बिघाड झाल्याने चालकाने पाणी सोडलेमंगळवारी हिवरा रोड लगत एका शेततलावात शासकीय टँकरने पाणी टाकल्याची बातमी प्रकाशित होताच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर चौकशी केली. अखेर तपास लावत तो टँकर सावरगाव येथे पाणी पुरवठा करत असून बिघाड झाल्याने चालकाने पाणी सोडल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. त्यामुळे नोटीस देऊन अधिकारी परत आले.या प्रकरणात केवळ नोटीस न बजावता कारवाई करावी नसता उपोषणाला बसणार असल्याचे दादासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समितीwater transportजलवाहतूक