शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 20:34 IST

बीडच्या वडवणी तालुक्यातील दुर्दैवी घटना

बीड : लग्न झाल्यानंतर पत्नीसोबत देवदर्शन केले. त्यानंतर घरी येऊन थोडाफार पाहुणचार झाला. रविवारी सकाळी अचानक नवरेदवाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. यामुळे घरातील कुटुंबावर शोककळा पसरली. वडवणी तालुक्यातील खडकी येथे ही घटना घडली. अशोक सुग्रीव करांडे (२७, रा. खडकी ता. वडवणी) असे मृत्यूमुखी पावलेल्या नवरदेवाचे नाव आहे. २१ मे रोजी अशोकचे लग्न माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर अशोक जोडीने देवदर्शनासाठी गेला. रविवारी सकाळी ९ वाजता बहिणीच्या मुलांना कपडे आणण्यासाठी अशोक दुचाकीवरुन खडकी येथून वडवणीकडे जात होता. वडवणी शहराजवळ आल्यावर त्यास अचानक भोवळ आली. त्यानंतर तो दुचाकीवरुन खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबद्दलची माहिती समजताच त्यात्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी रुग्णालय चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.सुखी संसाराचे स्वप्न भंगलेअग्नीला साक्षी ठेऊन अशोकने पत्नीसह सुखी संसाराचे स्वप्न रंगवले होते. मात्र, यावर अवघ्या पाचच दिवसांत विरजण पडले. अशोक हा नागपूरला एका कंपनीत नोकरीला होता. त्याचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका