शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदाम तपासणीचा अहवाल आज होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:53 IST

जिल्हा पुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते. ही तपासणी तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरु झाली सोमवारी व मंगळवारी तपासणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.साधारण दोन वर्षापूर्वी एका प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागातील सावळा गोंधळ पाहून या वर्षाच्या मागील आठवड्यापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त होते. तरी देखील धान्य गोदामामधून होणारी चोरट्या पद्धतीने होणारी धान्य विक्री होत असल्याच्या तक्रारी येतच होत्या. बीडसह इतर काही गोदामांमधील १ महिन्याचे आगाऊ येणारे धान्य गायब असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. या सर्व गोष्टी आता तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने घोटाळा केलेले गोडाऊन कीपर व त्यासोबत सहभागी असणा-या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील २२ शासकीय धान्य गोदामांची तपासणी करुन ११ व १२ मार्च रोजी अहवाल सादर करण्याच्या सूचना पथकामध्ये सहभागी असणा-या तहसीलदारांना दिल्या आहेत. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे धान्याची शासकीय वाहनातून नियमित पुरवठा होत आहे का? तसेच गोदामातील अभिलेख अद्ययावत आहे का ? नोंदणीप्रमाणे धान्यसाठा आहे का ? या बाबींची तपाणी करण्यात येणार आहे सोमवारी काही गोदामांची तपासणी झाली असून आज उर्वरित गोदामांची तपासणी केली जाणार आहे व तपासणीदरम्यान काय आढळले याचा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालनंतर दोषींवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडfraudधोकेबाजीsuspensionनिलंबन