शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांसाठी शासकीय मदतच आधार; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने प्रथम हात पुढे करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:53 IST

राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहेनिकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत करा

अंबाजोगाई- अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय मदतच आधार ठरेल. राज्य सरकारचा मदतीचा हात प्रथम पुढे आला पाहिजे. केंद्र सरकार तर मदत देणारच आहे. केंद्राच्या मदतीची वाट पाहत शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता तात्काळ मदत करावी. अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अंबाजोगाई तालुक्यात अपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथे मंगळवार दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.नमिता मुंदडा, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.रमेश कराड,आ.अभिमन्यु पवार, रमेशराव आडसकर, भिमराव धोंडे, अक्षय मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भगवान केदार, प्रवक्ते राम कुलकर्णी, सांरंग  पुजारी, अ‍ॅड.संतोष लोमटे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, वर्षभरापासुन सातत्याने शेतकर्‍यांवर संकटाचा मारा सुरूच आहे. अतिवृष्टी, वादळी, पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी पिकविमा भरूनही विमा कंपन्या शेतकर्‍यांना मुर्ख बनवत आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. मात्र राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.  त्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. 

...तर नियम बदलाअतिवृष्टी व वादळी पावसाने शेतकर्‍यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात इतर पिकांसोबत ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडला आहे. या संदर्भात नुकसानीची मागणी शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे. मात्र शासन हे नुकसान निकषात बसत नाही असे कारण पुढे करून शेतकर्‍यांना टाळत आहे. असे निकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडFarmerशेतकरी