शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:25 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या सरकारने आरक्षणाबाबत समाजाचा विश्वासघात केला. आता आरक्षणासाठी कठोर पावले उचलली जातील. सरकारला काम करणेही अवघड होईल अशी आंदोलने करण्याचा इशारा माजी मंत्री तथा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी दिला.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या सरकारने आरक्षणाबाबत समाजाचा विश्वासघात केला. आता आरक्षणासाठी कठोर पावले उचलली जातील. सरकारला काम करणेही अवघड होईल अशी आंदोलने करण्याचा इशारा माजी मंत्री तथा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी दिला.बीड येथे धनगर समाज कर्मचारी महासंघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अण्णासाहेब डांगे आले होते. कार्यक्रमापूर्वी रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर कडाडून टीका केली.धनगर व धनगड हे शब्द एकच आहेत. या सरकारने हे शब्द वेगवेगळे दाखवून समाजाची दिशाभूल केली. समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले. आज, उद्या आरक्षण देऊ असे म्हणत अभ्यास करण्यासाठी टीस ही संस्था नियुक्त केली. ही संस्थाही मुख्यमंत्र्यांनी सोडलेले पिल्लू आहे. त्यामुळे तिच्याकडून सकारात्मक अहवालाची काय अपेक्षा ठेवणार असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस सरकारने केवळ मतांसाठी समाजाचा वापर केला, विश्वासघात केला. परंतु आता यापुढे स्वस्थ बसणार नाही. कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलने केली जातील. या सरकारला काम करणेही अवघड होईल, असा इशाराही डांगे यांनी दिला.यावेळी समाजाच्या इतर प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. सोबत बीड येथील धनगर कर्मचारी महासंघाचे अंकुश निर्मळ, मल्हार सेनेचे अमर ढोणे, प्रकाश कानगावकर सह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडreservationआरक्षण