शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
5
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
6
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
7
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
8
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
9
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
10
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
11
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
12
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
13
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
14
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
15
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
16
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
17
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
18
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
19
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
20
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...

पिकांना जीवनदान, भर उन्हाळ्यात मांजरा धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:43 IST

मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : तालुक्यातील मांजरा जलाशयाच्या कालवा सल्लागार समितीने त्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 18 ) सायंकाळी 6 वाजता मांजराचे 4 दरवाजे 0.25 मीटर उंचीने उघडून 2 हजार 754 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा धरणाखालील नागझरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत पिकांच्या सिंचनासाठी 16.54 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील जमिनीवरील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भर उन्हाळ्यात पिकांच्या वाढीसाठीही याचा फायदा होणार आहे.

224.093 दलघमी साठवण क्षमता असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे 25 सप्टेंबर 2024 रोजी 100 टक्के भरले होते. या धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आज मितीस मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 107. 376 दलघमी एवढा आसून त्याची टक्केवारी 60.68 टक्के आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मांजराचे द्वार क्रमांक 1,3,4,व 6 हे चार वक्र दरवाजे 0.25 मिटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु  करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात डाव्या व उजव्या कालव्यातून प्रत्येकी तीन पाण्याची आवर्तने होणार आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत डाव्या व उजव्या कालव्यात एकूण 17 दलघमी एवढे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. व सध्या दोन्ही कालव्यात उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सुरू आहे.

तीन जिल्ह्यातील 18 हजार हेक्टर जमिन ओलिताखालीमांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत  बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील एकूण  18 हजार 223 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा 90 कि.मी. अंतर लांबीचा आहे. त्यातून 10 हजार 559 हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा 78 कि.मी. अंतर लांबीचा असून त्याअंतर्गत 7 हजार 665 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे सिंचनासह  पिण्याच्या पाण्यासाठी  मांजरा  धरण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

अतिदक्षतेचा इशारा मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे धरणा खालील नदीपात्रात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना  कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी आदेश काढून अती दक्षतेचा इशारा  संबंधित अधिकारी व पोलीस अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती मांजराचे सहाय्यक अभियंता सुरज निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणWaterपाणी