Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार
सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे गुप्त आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले असल्याचा दावा जरांगे यांनी केला. जरांगे पाटील म्हणाले, या प्रकरणात आणखी गोष्टी बाहेर येणार आहेत. यांच्या सरकारी बंगल्यावर बैठका झाल्याचे समोर आले आहे. आता थांबवाव लागणार आहे. ३०२ मध्ये धनंजय मुंडे आहेत फक्त फडणवीस यांनी या तपासाला फुलस्टॉप लावला आहे. एसआयटी, सीआयडी आणि स्थानिक पोलिसांना सगळं माहित आहे. पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून पुढं काही होत नाही. धनंजय मुंडे विषारी साप आहे .हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे .त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
'धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे'
"मी परवाही तेच सांगितलं. त्यांच्या मुख्य कार्यालयात त्यांची बैठक झाली आहे. त्या कार्यालयातून धनंजय मुंडे यांच्यावतीनेच कामे केली जात होती. हत्येचा पहिला कट त्या बंगल्यावरच रचला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही जरांगे पाटील म्हणाले. तपास यंत्रणेकडे त्यांच्याविरोधात पुरावे आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी सिग्नल दिलेला नाही, त्यांनी सिंग्नल दिला तर मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होईल, तपास यंत्रणा हतबल आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले.