शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, दावणीला चारा द्या- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:45 IST

शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. तालुक्यातील जवळबन येथील दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हक्काच्या मागण्यांसाठी शेतक-यांनी रस्त्यावर यावे. आपण अखेरपर्यंत साथ देऊ अशी ग्वाही दिली. प्रभू रामाचा आदर असल्याचे सांगून राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल; मात्र सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतक-यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले. तर यावेळी पूजा मोरे यांनी कारखानदारांनी व प्रशासनाने यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी लेखू नये असा इशारा देत शेतक-यांनी लाचारीचं जीवन जगणे सोडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. पोपळे, शर्मिला येवले, रसिका धगे यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्र माचे प्रास्ताविक कुलदीप करपे यांनी केले. या परिषदेस केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdroughtदुष्काळ