शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:02 IST

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

अंबाजोगाई (बीड ) : सततच्या छेडछाडीला कंटाळुन व मानसिकरित्या त्रस्त झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने रविवार रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

वैष्णवी अशोक लव्हारे (वय १६, रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. तिच्या गावातील  अमित साहेबराव माने (वय १९) याने रोहन गोविंद फड (वय १९) याच्या मदतीने संगनमताने वैष्णवी सोबत जवळीकता साधत तिच्या घराकडे सातत्याने दुचाकीवरून चकरा मारून पाठलाग केला आणि तिचा विनयभंग केला. या दोघा तरुणांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास देखील दिला. अखेर या त्रासाला कंटाळून वैष्णवीने रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरात गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले असे वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. 

अशोक लव्हारे यांच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अमित माने आणि रोहन फड या दोघांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बाळासाहेब मुळे हे करत असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई