शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

बीड जिल्हा हादरवणारे तिहेरी हत्याकांड, पती-पत्नी, बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

By संजय तिपाले | Updated: January 17, 2023 14:28 IST

बीड जिल्हा हादवणाऱ्या घटनेत न्यायालयात निकाल, तब्बल २२ साक्षीदार तपासण्यात आले

बीड: गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या करून दोन मुलींवर हल्ला केला होता. उपचारादरम्यान बाळंतीण मुलीचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच्या या घटनेत दोन आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी १७ जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गेवराई शहरातील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय ५०) राहत. २४ ऑगस्ट २०१७ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.दरोडेखोरांनी आदिनाथ व अलका घाडगे (४२) यांच्यावर धारदार शस्ञांनी  हल्ला चढवला. यानंतर बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (२२) व स्वाती घाडगे (१८) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली.  त्यानंतर सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता.गेवराई, हमु. अचानकनगर, गेवराई) व लखन प्रताप भोसले (रा.कौडगाव घोडा ता.परळी) यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. 

२२ साक्षीदार तपासलेप्रमुख जिल्हा सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांनी २२ साक्षीदार तपासले. अजय राख यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीला दोषी ठरवले. १७ जानेवारीला जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडCourtन्यायालय