शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गटार, पाणी योजना तात्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:51 IST

बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश : नियोजन व नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय समिती; पालिका, मजिप्र अधिकाऱ्यांची बैठक

बीड : बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. तसेच याचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. रखडलेल्या कामावरून बीड पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.बीड शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे. २४ महिन्यात ही योजना पुर्ण करणे अपेक्षित होते. परंतु १८ महिन्यात केवळ ३२ किमीचेच काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या योजनेच्या कामावर नियंत्रण आहे. परंतु मजिप्रने पालिका जागा उपलब्ध करून देत नाही, असे कारण सांगितले आहे. तर पालिकेने जागा सोडून इतर कामे करण्यास मजिप्रला काय अडचण आहे? आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे, असे सांगितले जात आहे. दोघांच्या टोलवाटोलवीमुळे शहरवासीयांमध्ये संताप आहे.पालिका व मजिप्र अभियंत्यांची बाजू घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. यावर लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. गुरूवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह मजिप्रचे सभप महाजन, नगरविकासचे पा.पो. जाधव, आर.एस.लोलापोड, पी.आर.नंदनवरे, व्ही.आर.बडे, एम.एच.पाटील, पालिकेचे अभियंता राहुल टाळके आदींची उपस्थिती होती.मुंडे यांनी उपस्थित अधिकाºयांची कानउघडणी करीत दोन्ही योजनांचे कामे तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये एक आमदार, नगरविकास व मजिप्रचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत.नवीन प्रकल्प आणावा; आयत्या पिठावर रेघोट्या नको - नगराध्यक्षदोन वर्षापूर्वीच भुयारी व पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर करून आणल्या. निधीही तेव्हाच आणला. त्यामुळे नव्याने निधी आणण्याचा प्रश्नच येत नाही. जागेबाबत वारंवार बैठका घेतल्या. परंतु सहा महिन्यांपासून महसुलकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. मजिप्रलाही वारंवार पत्र दंडात्मक कारवाई करण्याबाबत कळविले. परंतु अद्याप काहीच कारवाई नाही. तसेच कामासाठी तुटलेले रस्ते तात्काळ दुरूस्त करणे अपेक्षित होते. परंतु तेही केले नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास झाला. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर विरोधक बाकावर असलेल्या नगरसेवकांनी काम अडविले होते. आता आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सुरू झाले आहे. नवा प्रकल्प मंजूर करून आणावा. आम्ही एक योजना आणली तर तुम्ही दोन आणाव्यात. राजकारण विकास करण्यासाठी असावे, मागे खेचण्यासाठी नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे