शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या शेतकऱ्याची किमया, उजाड डोंगरावर खरबूज शेती फुलवून घेतले लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:49 IST

गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकऱ्याने बालाघाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत शेती फुलवून  खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे.

ठळक मुद्देअंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे.याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात १२ एकर शेती आहे.

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकऱ्याने बालाघाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत शेती फुलवून  खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे. व्यापाऱ्याच्या नादाला न लागता  स्वत: खरबुजाची विक्री केल्याने अधिक फायदा झाल्याचे विठ्ठल गडदे यांनी सांगितले.

अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे. याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात १२ एकर शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतीतून बाहेर पडण्याचा निर्णय गडदे यांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर हिंमत धरून एक एकरमध्ये निर्मल २२५ वाणाचे खरबुज बियाण्याची सव्वा फूट बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. त्यापूर्वी मशागत करून व  शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. जानेवारी अखेरीस मल्चिंग पेपर अंथरून  खरबूज बियाणे लावण्यात आले. पाणी व्यवस्थापनासाठी विहीर आहे. ठिबक सिंचनाद्वारे पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. 

खरबूज पीक ७० ते ८० दिवसांत काढणीस येते. गडदे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोसलेले व पक्व झालेले खरबूज व्यापाऱ्यास न देता थेट अंबाजोगाई शहर गाठले. स्वत: चौकात उभारून खरबूज विक्रीसाठी उपलब्ध केले. मित्र आप्पासाहेब गडदे, श्रीराम गडदे यांनी वेळोवेळी मदत केली. २५ ते ३० रुपये प्रती किलोप्रमाणे पाच टन खरबुजाची विक्री केली. एकूण विक्रीतून त्यांना एक लाख रुपये मिळाले. यातील ५० हजार रुपये लागवडीसाठी व इतर खर्च झाला. ७० दिवसात विठ्ठल गडदे यांना ५० हजार रुपये फायदा झाला. यातून मित्रांकडून घेतलेले पैस ेफेडले. विशेष म्हणजे शेतकरी विठ्ठल गडदे यांनी मित्र, नातेवाईक, शेजारी या सर्वांना खरबूज खाण्यासाठी शेतात आमंत्रणे दिली होती. जे येऊ शकले नाहीत त्यांना पार्सल पाठवले.

शेती मशागतीसाठी गडदे यांना आई कलुबाई, पत्नी सुमन, मुलगा रामराज्य, धर्मराज यांचे नेहमी सहकार्य असते. वडिलानंतर कुटुंबाची जिम्मेदारी आई कलुबाई यांच्या खांद्यावर आली. आईच्या प्ररणेने विठ्ठल गडदे यांनी शेतात पूर्ण वेळ दिला. नव्यानेच गडदे यांनी यंदा मार्च महिन्यात  काशी फळाची,भोपळ्याची एक एकर क्षेत्रात लागवड केली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत. यातून चांगले उत्पन्न होण्याची त्यांना आशा आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmarket yardमार्केट यार्डBeedबीड