शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:35 IST

पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

बीड : पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

१४ जानेवारी रोजी धारुर तालुक्यातील गावंदरा तांड्यावर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत आरोपी आल्याची माहिती मिळाली. धारुर ठाण्याचे उप निरीक्षक चंद्रकांत घोळवे हे तोकडा बंदोबस्त घेऊन त्याला पकडण्यासाठी रवाना झाले. विशेष म्हणजे याची माहिती वरिष्ठांना दिली नाही. तांड्यावर गेल्यानंतर आरोपीला बेड्याही ठोकल्या. परंतु तोकड्या बंदोबस्ताचा फायदा घेऊन त्या आरोपीने पलायन केले. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून या पोलिसांनी शासकीय वाहन जाळून उसाने मारहाणीचा प्रयत्न केल्याचा बनाव केला. 

यासोबतच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही ठाण्यात नोंद केला. परंतु हे सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोराडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. वेगवेगळे मुद्दे तपासून उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांना चौकशीचे आदेश दिले.तब्बल १५ दिवस उलटूनही नाईक यांनी चौकशी पूर्ण न केल्याने संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लक्ष घाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पोलीस निरीक्षक गंधमही संशयाच्या भोवर्‍यातविश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण धारुर पोलिसांना चांगलेच अंगलट येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम हे मात्र या प्रकरणापासून दूर राहत आहेत. यापूर्वीही ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेला अट्टल गुन्हेगार विलास बडे याने ठाण्यातून पलायन केले होते. हे प्रकरण गंधम यांच्यावरही शेकणार असल्याचे समजते. 

जबाब बाकी आहेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे जबाब घ्यावयाचे आहेत. त्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल. दहा दिवसात चौकशी पूर्ण केली जाईल.- मंदार नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, केज

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड