शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपवले : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 15:53 IST

हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

बीड : मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील गँगवॉर संपवले होते. तसे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपण्यात मला यश मिळाले आहे, अशा शब्दात विरोधी राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हातील राजकारणावर असलेला वचक दाखवून दिला.  

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही काम करतो, आता त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेली आहेत, ही मुळं चांगल्या विचाराची व संस्कृतीची आहेत, दहशतीची किंवा कुणाला त्रास देणारी नाहीत.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. त्यांच्या अशा संस्कारामुळे  समाजातील वंचित पीडित घटकांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळते, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरु न वार करा, हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर आ. आर टी देशमुख,आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, आ. पवार, गोविंदराव केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राधाताई सानप, यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

दुटप्पीपणा जास्तकाळ चालणार नाही मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले, दु:खावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या कांही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नांव मात्र दुसऱ्याचे घेतात, असा दुटप्पीपणा फार काळ चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपा