शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

बीडमध्ये कापसाचा ट्रक लुटणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:38 IST

या टोळीवर परभणी व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर येत आहे.

ठळक मुद्देबीड एलसीबीची कारवाई परभणी, बीड जिल्ह्यात केले गुन्हे

बीड : पिस्तूलचा धाक दाखवून कापसाचे ट्रक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील सिरसाळा येथे करण्यात आली. या टोळीवर परभणी व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर येत आहे.

अमृत भाऊसाहेब देशमुख (३६ कन्नापूर ता.धारूर), राजेश ज्ञानोबा बडे (४० रा.सिरसाळा), भगवान उर्फ सोनू शेषराव मुंडे (३० रा.डाबी ता.परळी), आकाश भिमराव गायकवाड (३० रा.सिरसाळा), दीपक भिमराव केकान (२४ रा.दिंद्रुड चाटगाव सांगळेवस्ती ता.धारूर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. २३ डिसेंबर रोजी शेख इलियास शेख मुसा व बिभीषण शंकर फसके हे दोघे कापसाचा भरलेला ट्रक घेऊन जात होते. रात्रीच्या सुमारास धारूर घाटात त्यांना या दरोडेखोरांनी गाठले. लिफ्टच्या बहाण्याने दोघे ट्रकमध्ये बसले. नंतर त्यांना दारू पाजून बेशुद्ध केले आणि त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जिनींगवर गेले. येथे कापूस विक्री केल्यानंतर ट्रक जालना जिल्ह्यात नेऊन सोडला.

याप्रकरणी धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या दोन दिवसांत पाचही दरोडेखोरांना गजाआड केले. त्यांच्याकडून पिस्तूल, जीप असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कापूस विक्री केलेले पैसेही वसुल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. या सर्व आरोपींना धारूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, परी.उपअधीक्षक रोशन पंडित, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनखाली एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, मनोज केदारे, भास्कर केंद्रे, मुंबाजा कुंवारे, दिलीप गलधर, बालाजी दराडे, शेख सलीम, नरेंद्र बांगर, सतीष कातखडे, विष्णू चव्हाण, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, अशोक मिसाळ, भागवत बिक्कड, मुकूंद सुस्कर, सुग्रीव रूपनर आदींनी केली.

आणखी गुन्हे उघड होतील कापसाचा ट्रक लुटणारे पाच जणांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सर्व आरोपी धारूर पोलीस ठाण्यात आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :theftचोरीArrestअटकPoliceपोलिस