शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत जनसहयोगची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:07 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा, अशी मागणी सातत्याने करूनही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक, जनसहयोग ...

ठळक मुद्देदुर्लक्ष : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात लावली बेशरमाची झाडे

अंबाजोगाई : अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा, अशी मागणी सातत्याने करूनही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक, जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी शुक्र वारी सकाळी रस्त्यावरील खड्ड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाची झाडे लावून गांधीगिरी आंदोलन केले.शहरात मुख्य व इतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र या मागणीची दखल न घेतल्याने शुक्र वारी सकाळी गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आले. या वेळी मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासमोर रांगोळी काढली व त्या खड्डयामध्ये बेसरमाची झाडे लावून आपला निषेध नोंदवला.या आंदोलनात धनराज मोरे, पुंडलिक पवार, भागवत कांबळे, लालसाहेब आगळे, नगरसेवक संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, शाम सरवदे, अमन लोहिया, डॉ.प्रवीण गुजर, व्ही.डी.शिंदे, विलास लोखंडे, रवि देशमुख, संजना आपेट, सावित्री सगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन