शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:16 IST

या जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

परळी (बीड) : शहरातील हमालवाडी येथे आज पहाटे केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पथकासह जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून सहा लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी 15 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमालवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून साईनाथ उर्फ बंटी माने हा जुगार अड्डा चालवतो. येथे जुगार खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्वतः पंकज कुमावत यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत पहाटे पावणे तीन वाजता जुगार अड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगारी पळून गेली. पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच 1 लाख 52 हजार 940  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकूण 15 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादिवरून कलम 4,5 महा. जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, आंबाजोगाईच्या  अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस अंमलदार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, विकास चोपणे, अनिल मंदे, सचिन अहंकारे, संजय टूले यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड