बीड : निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील १०० लोकांना सात दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. पैकी ६० लोकांना तात्पुरत्या स्वरूपात जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात शारीरिक इजा तसेच इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास दीड हजार उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर हद्दपारीसह एमपीडीएसारख्या कारवाया केल्या होत्या. निवडणूक शांततेत पार पडली. आता मतमोजणी देखील निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी नियोजन केले आहे. उपद्रवी लोकांचा ‘डाटा’ जमा करून त्यांच्यावर जिल्ह्यातून हद्दपारीची तात्पुरती कारवाई केली. या कारवाईने दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून आणखी उपद्रवीची माहिती घेणे सुरुच होते.
उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:23 IST
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील १०० लोकांना सात दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाई : दुखापत, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने केली कारवाई