शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या युवासेनेत चार स्कॉर्पिओ गिफ्टवरून जुंपली? दोन्ही मराठवाडा निरीक्षकांत पत्रकबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:54 IST

युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी निष्ठावंत चार युवा सैनिकांना स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. याची चावी मंत्री सिरसाट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली.

बीड : दोन दिवसांपूर्वी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून बीडमधील चार निष्ठावंत युवा सैनिकांना मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. त्यानंतर काही तासांत याविरोधात दुसरे मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांनी पत्रक काढले. हे चार युवासैनिक पदाधिकारी आहेत का, असा सवाल उपस्थित केला. हा केवळ नेत्याला खूश करण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा आरोपही पिंगळे यांनी केला. यावर चव्हाण यांनी अशा आरोपांवर बोलणार नाही. पण, मी चार वाटल्या तर तुम्ही १० वाटा, असे प्रत्युत्तर दिले.

बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी तिरंगा रॅली काढण्यात आली. यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर दुपारच्या वेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी निष्ठावंत चार युवा सैनिकांना स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. याची चावी मंत्री सिरसाट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. याचे पत्रक निघताच चव्हाण यांचेच सहकारी असलेले मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. हे सर्व चव्हाण यांचेच नातेवाईक असल्याचा आरोप करीत केवळ नेत्याला खूश करण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून युवासेना पदाधिकाऱ्यांमध्येच आता जुंपल्याचे दिसत आहे.

यापूर्वीही अनेकदा वादविधानसभा निवडणुकीपूर्वीदेखील शिवसेना आणि युवासेना यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर बीड शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात मेळावा झाला होता, त्यावेळी युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी एकत्र राहून काम करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही दिवस एकजूट दिसली. पण, आतून धुसफुस सुरूच होती. आतादेखील युवासेनेतच वाद सुरू झाला आहे. तर बाजीराव चव्हाण यांनीही पक्षातीलच सिनियर लीडर यामागे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना-युवासेना असा अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे.

पाय ओढण्याचे काममला या आरोपावर काही बोलायचे नाही. परंतु, मी जर चार वाटल्या असतील तर तुम्ही १० द्या. काम करणाऱ्यांना कशाला मागे ओढता? आम्ही पक्ष वाढविण्यासाठी काम करतो. माझं काम वरिष्ठांना, सर्वांना माहिती आहे. ज्यांनी हे पत्रक काढले, त्यांच्यामागे कोणीतरी पक्षातीलच सिनियर आहे. परंतु, त्यांनीही हे करताना विचार करायला हवा होता. पाय ओढण्याचे काम करू नये.- बाजीराव चव्हाण, मराठवाडा निरीक्षक, युवासेना

नेत्यांना खूश करण्यासाठी खटाटोपबाजीराव चव्हाण यांनी ज्या चार युवासैनिकांना स्कॉर्पिओ गिफ्ट केल्या, ते खरोखरच पदाधिकारी आहेत का, हा प्रश्न आहे. ते त्यांचे नातेवाईक, जवळचे कर्मचारी आहेत. पण, तरुण आणि नेत्यांना खूश करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला आहे.- विपुल पिंगळे, मराठवाडा निरीक्षक, युवासेना

टॅग्स :BeedबीडShiv Senaशिवसेना