शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:58 IST

महावितरणतर्फे कारवाईची धडक मोहीम 

ठळक मुद्दे१ लाखापेक्षा जास्त ६४६ ग्राहकांकडे १४ कोटींची थकबाकी

बीड : महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत. या सर्वांची यादी तयार करून महावितरणने आता वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी ११६ ग्राहकांची वीज तोडली आहे. विशेष म्हणजे बड्या असलेल्या ६४६ ग्राहकांकडे तब्बल १४ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती गुरूवारीसमोर आली आहे.

बीड जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. वीज वापर करूनही बिले भरण्यास ग्राहक उदासीन असल्याने थकबाकीचा आकडा अब्जावधीच्या घरात गेला आहे. हाच धागा पकडून महावितरणने आता कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात एक लाखांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

घरगुती आणि व्यवसायासाठी वीज वापर करून बिले न भरणाऱ्या ११६ ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. कारवाईची मोहीम हाती घेताच ६२ ग्राहकांनी तात्काळ महावितरणकडे धाव घेत थकबाकी भरल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून या कारवाईत किती सातत्य राहते आणि दुजाभाव न करता पारदर्शकपणे कारवाया करण्याचे आव्हान असणार आहे. सर्व थकबाकीदारांमध्ये धनदांडग्यांचा समावेश आहे. राजकीय दबाव, गुंडगिरी करून कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांर दबाव आणला जात असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हे सर्व झुगारून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

१५ पथके आठवड्यात करणार मोहीम फत्तेमहावितरणने बड्या थकबाकीदारांविरोधात कारवाया करण्यासाठी जिल्ह्यात १५ पथके  नियूक्त केले आहेत. यामध्ये एका अभियंतासह तांत्रीक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवघ्या आठवडाभरात हे पथके मोहीम फत्ते करणार असल्याचा विश्वास अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी व्यक्त केला आहे.

पेठबीडमध्ये पथकाला शिवीगाळ१ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या पथकाला ग्राहकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. धनदांडग्या व गुंड ग्राहकांवर कारवाई करण्याचे आव्हान या पथकांसमोर आहे.

मंत्र्यांची महाविद्यालये, माजी मंत्र्यांच्या मुलांकडेही लाखोंची थकबाकीमहावितरणच्या बड्या थकबाकीदारांच्या यादीमध्ये  माजी मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. तसेच काही शासकीय अधिकाऱ्यांचे क्वार्टर्सचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

१ लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ६४६ ग्राहकांची यादी तयार करून वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ११६ जणांवर कारवाई केली. ६२ ग्राहकांनी पैसे भरले आहेत. आठवड्यात या कारवाया होतील. त्यानंतर ५० हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. - संजय सरग,अधीक्षक अभियंता, महावितरण बीड 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजBeedबीड