शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:29 IST

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

कडा : आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.लिंबोडी येथील आजिनाथ सुभानराव आंधळे यांचे कडा लिंबोडी रस्त्यालगत घर आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व गाढ झोपेत होते. यावेळी तोंडाला बांधलेल्या तिघांनी हातात धारदार शस्त्र घेऊन घराचे दार तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान घरातील मंडळी जागी झाली होती. मात्र, त्यांना धारदार शस्त्र दाखवून ‘आरडा-ओरड करायची नाही’ अशी धमकी दिली. तसेच घरातील मौल्यवान वस्तू कुठे आहेत. पैसे व इतर वस्तू चोरण्याच्या उद्देशाने दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी टी.व्ही. टेबलच्या लॉकरमध्ये ठेवलेले आठ तोळ््यांचे सोन्याचे दागिने, बारा हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल असा ऐवज चोरी केला. त्यानंतर देखील चोरट्यांनी घरातील व्यक्तींना धमकावले व पुन्हा घराचे दार बाहेरून लावून पोबारा केला. त्यानंतर घरातील व्यक्तींनी आरडाओरड केली. त्यानंतर गावातील नागिरकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी लिंबोडी येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि सलीम पठाण हे करत आहेत.पहाटेच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवून केलेल्या या जबरी चोरीमुळे लिंबोडी या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची व चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.गळ्याला चाकू लावताच महिला झाली बेशुद्धअज्ञात तीन-चार चोरट्यांनी तोंड बांधून घरात प्रवेश करताच आमच्या गळ्याला चाकू लावला आणि आरडाओरडा केला तर जिवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान गळ््याला चाकू लावताच घरातील रामकवर नामक महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर नेमके काय करावे, हेच त्यांना सुचले नाही. शुद्धीवर आल्यावर त्या म्हणाल्या ‘नशीब चांगले म्हणून काही बरेवाईट झाले नाही. असे रडत-रडत रामकवर आंधळे यांनी बेतलेला प्रसंग सांगितला’ यावेळी घरातील सर्वच जण घाबरलेले होते.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPoliceपोलिस