शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : खरीप, दुष्काळ, टंचाई आढावा बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

बीड : दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नियमित कर्जभरणा करणाºया शेतक-यांच्या अनुदानाचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रविवारी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगिता ठोंबरे, जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषि विभागाने तयार केलेल्या भितीपत्रक, घडीपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये कपाशी वरील बोंडअळी नियंत्रण नियंत्रण, व्हाईट बग (खुमणीचे) नियंत्रण, तसेच शेतकºयांसाठी माहितीचे मोबाईल अ‍ॅपलॉन्च करण्यात आले.पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, नियोजन केलेल्या जास्तीत जास्त शेतक-यांना सौरपंप मिळावे म्हणून महावितरणने तात्काळ काम करावे. दुष्काळाच्या पाशभूमीवर शेतक-यांची वीज खंडीत केली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी शेतकºयांच्या बॅँकेविषयीच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व विभागांनी योग्य काम करुन शेतक-यांना दिलासा द्यावा, असे आ. सुरेश धस म्हणाले. आ. संगीता ठोंबरे यांनी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पीकविमा भरपाई मिळावी याकडे लक्ष वेधले. आ. देशमुख,आ. पवार, आ. धोंडे यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पीक कर्ज व शेती अनुदान शेतक-यांना मिळावे यादृष्टीने जिल्हयातील बँकामार्फत कार्यवाही केली जाईल असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सोयाबीन क्षेत्रात साडेतीनशे टक्यांनी वाढ झाली असून कापूस क्षेत्र दीडशे टक्यांनी वाढत आहे.खरीप हंगामासाठी जिल्हयात ६०,००५ मे.टन खत पुरवठा होणार असून, कापूस बियाणे ७ लाख २२ हजार २५ पाकिटे प्रत्यक्ष पुरवठयासाठी उपलब्ध केले असल्याचे सांगण्यात आले.अनुदान मिळण्यात अडचण नाहीदुष्काळामुळे शेतक-यांना शासनाने कर्जमाफी दिलेली आहे. त्यामधील नियमित कर्ज भरणा-या खातेदार शेतक-यांना अनुदान मिळण्यात अडचण नाही.थकबाकी आणि दुष्काळामुळे अडचणीतील शेतकºयांना अनुदान मिळत नसल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी आदी दुष्काळी भागातील शेतकºयांना अनुदान रक्कमा मिळण्यासाठी योग्य ते निर्देश संबंधितांना दिले जावे यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये प्रयत्न करु असे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.आष्टी, पाटोदा, शिरुरसाठी अहमदनगर येथील पाणीपालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाणी टंचाई वरील उपाययोजनांचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या, आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील जनतेच्या पाण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात येतील.त्यासाठी विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागातील संबंधितांशी बोलून प्रश्न सोडवू.गेवराईसाठी विशेष उपाययोजनेस मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.आमदारांनी मांडले प्रश्नगेवराई येथील पाणीटंचाई वरील उपाय योजनांबाबत आमदार पवार यांनी प्रश्न मांडले.आष्टी पाटोदासाठी सीना प्रकल्पातून पाणी प्राप्त होत आहे. पण येथील पाणी अपुरे असल्याने कुकडीतून पाणी मिळावे अशी सूचना आ. धोंडे व आ. धस यांनी मांडली.इतर आमदारांनीही त्यांच्या मतदार संघातील परिस्थिती मांडली.जिल्हयातील पाणी प्रकल्पात १५८ दलघमी साठा शिल्लक असून उपयुक्त पाणी टक्केवारी ०.५६२ टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र