शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video: हाती पताका, मुखी हरीनाम; मुस्लीम भाविकांकडून वारकऱ्यांची सेवा, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 20:34 IST

गावातील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचे स्वागत, नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आदर्श घालून दिला. 

- नितीन कांबळेकडा  -आष्टी तालुक्यातील धामणगावात नेहमी विविधतेत एकता अनुभवयाला मिळते. गावामध्ये विविध जाती-धर्माची लोक मोठ्या गुण्यागोंविदाने राहतात. पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील खामगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांना चहा-नाष्ट्याची व्यवस्था मुस्लीम बांधवांनी केली. तसेच दिंडीसोबत काहीवेळ सोबत जात 'ग्यानबा...तुकाराम' म्हणत ठेका धरला. यातून हिंदु-मुस्लिम ऐक्य किती घट्ट आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. 

आषाढी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची सर्वांना ओढ लागलेली आहे. अनेक वारकरी दिंडीत सामील होऊन पंढरीला जातात. तर काही मंडळी वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानतात. यावर्षी नेवासा तालुक्यातील खामगांव येथील वारकरी पांडुरंग भेटीसाठी दिंडी घेऊन प्रथमच निघाले. दरम्यान, धामणगांव येथील मुस्लिम बांधवांनी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत, नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आदर्श घालून दिला. दिंडीला निरोप देतानाचे दृष्य तर अत्यंत मनमोहक होते. डोक्यावर टोपी, गळ्यात पंचा तर हातात भगवी पताका घेऊन मुखी हरिनाम घेत मुस्लिम बांधवांनी जागोजागी फुगडी खेळली. विठूरायाच्या जयघोषात नाचण्यात तल्लीन झाले. 

माणुसकीचा धर्म सर्वात मोठा जातीयतेपेक्षा माणूसकी हा धर्म मोठा आहे. ती शिकवण आम्ही आजवर जोपासल. येथून पुढेही ही परंपरा अखंड राहील, असे धामणगावचे माजी सरपंच तथा आष्टी दुध संघाचे चेअरमन संजय गाढवे यांनी सांगितले.

प्रत्येकात पांडुरंग- अल्लाहआम्ही स्वतःला धन्य समजतो की, आम्हाला ही सेवा देण्याचे भाग्य लाभले. देशात- राज्यात काय सुरु आहे, याकडे आम्ही कधीच पाहत नाही. प्रत्येकाच्या अंतरात्म्यात पांडुरंग-अल्लाह असल्याच्या भावना धामणगावचे उपसरपंच डॉ. अकील सय्यद यांनी व्यक्त केल्या

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022BeedबीडPandharpur Wariपंढरपूर वारी