शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत वनरक्षक तर बीडमध्ये क्षेत्र सहायक लाच घेताना चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:12 IST

बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली.

ठळक मुद्देएसीबीच्या कारवायांचा धडाका : दोघांविरोधातही गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली.तुती लागवडीचे (रेशीम शेती) व किटक पालनासाठी उभारलेल्या शेडचे अनुदानासाठी दाखल केलेल्या दोन फाईल मंजूर करण्यासाठी बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक बाळासाहेब नामदेव सूर्यवंशी यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. १३ डिसेंबर रोजी याबाबत सापळा लावला. मात्र त्यांनी त्यावेळी केवळ लाचेची मागणी केली, स्वीकारली नाही. नंतर मंगळवारी पुन्हा सापळा लावला. मात्र लाचेबाबत सूर्यवंशी यांना कुणकुण लागल्याने त्यांनी लाच घेतली नाही. मात्र लाच मागितली म्हणून सूर्यवंशी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दुसरी कारवाई आष्टी येथील बसस्थानक परिसरात झाली. लाकुड वाहतुकीचे ट्रॅक्टर चालु देण्यासाठी वनरक्षक त्रिंबक सीताराम पवळ यांनी १५०० रूपयांची लाच मागितली होती. १४ डिसेंबरला लाच मागितल्याची खात्री पटली. मंगळवारी आष्टी बसस्थानकाच्या समोर लाच घेताना पवळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस.आर.जिरगे यांच्य मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोनि गजानन वाघ व त्यांच्या चमूने केली.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग