शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पथकाकडून पावणेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:21 IST

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात ७९८ आरोपींना ठोकल्या बेड्या : दारू, जुगार, मटका, वाळू माफियांचे कर्दनकाळ

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आतापर्यंतच्या पथकांमध्ये ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जानेवारीत नव्याने दुसरे पथक नियूक्त केले. या पथकात सर्व तरूण अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले. पथक प्रमुख म्हणून रामकृष्ण सागडे यांच्यावर जबाबदारी सोपविली. पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाने, गणेश नवले, अंकुश वरपे, जयराम उबे, हनुमंत राठोड हे कर्मचारी त्यांच्या सोबतीला दिले.नियुक्ती होताच पहिल्याच दिवशी पथकाने गेवराई तालुक्यात गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना दणका दिला. जेसीबी, हायवासह अनेक वाहने ताब्यात घेतले. वाळू माफियांसाठी हा पहिला दणका ठरला. त्यानंतर जुगार, मटका, दारू, आयपीएल, अवैध कत्तलखाना, गोमांस, कत्तलखान्यात जाणारे जनावरे सोडणे, रॉकेल, गॅस, अवैध फटाका स्टॉल, गुटखा अड्डयांवर धाडी टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोटींचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक अचानक धाडी टाकत असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.तडीपार आरोपी, आर्म अ‍ॅक्टच्या कारवायापोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतरही जिल्ह्यात वावरणाºया ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. ७ तलवार व १ गावठी कट्टा पकडून ८ जणांवर आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल केले. तसेच नियमित बंदोबस्तही केला. चार महिन्यात या पथकाची एकही तक्रार नसल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी