शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा पहाडी शाळेत ७ शिक्षक गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:57 IST

जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी १३ पैकी ७ शिक्षक गैरहजर आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी १३ पैकी ७ शिक्षक गैरहजर आढळून आले. शिक्षणाधिकारी सुदाम राठोड यांनी अचानक केलेल्या पाहणीत याशिवाय केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांचा गैरकारभारही चव्हाट्यावर आला. या प्रकरणी कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी राठोड, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, विस्तार अधिकारी तुकाराम पवार यांनी जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी येथील जि. प. शाळेला भेट दिली. त्यावेळी सात शिक्षक गैरहजर आढळून आले.याबाबत विचारणा केली असता केंद्रीय मुख्याध्यापकाने आयकर विवरण पत्र भरण्यासाठी प्रत्येक शाळेतील ५० टक्के लोकांनी केंद्रीय प्राथमिक शाळा जरुड येथे उपस्थित राहण्याबाबत (सोशल मीडियावरील ग्रुपवर) कळविल्याचे सांगितले. मात्र केंद्रीय मुख्याध्यापकाला शिक्षकांच्या खाजगी कामाबाबत अशा सूचना देता येत नाहीत. तसेच केंद्रीय मुख्याध्यापक भगवान पवार यांची नियुक्ती दुरुगडे जि. प. शाळेवर आहे. वरिष्ठांचे आदेश नसताना येथे या पदावर चार वर्षांपासून कार्यरत असल्याचे देखील यावेळी चौकशीत उघड झाले.शिक्षकच पाहतो कारभारकेंद्रपमुख, केंद्रीय मुख्याध्यापक कसलेही काम पाहत असल्याचे दिसून आले. तर शिवणीपासून जवळच असलेल्या भिल्लवस्ती येथील शाळेचा एक शिक्षक दोघांची कामे पाहत असल्याचे पुढे आले. बैठक, टपाल, सूचना, संदेश देण्याचे काम खरात नामक शिक्षक करत असल्याचे या पथकाच्या तपासणीत आढळले.केंद्रप्रमुख नावालाचजरुड केंद्रांतर्गत केंद्रप्रमुख म्हणून सिद्दीकी सादेक काम पाहतात. या केंद्रांतर्गत ३० शाळा येतात. मात्र जॉबचार्टनुसार यापैकी एकाही शाळेला जूनपासून केंद्र प्रमुखांनी भेट दिली नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे घटक शाळेवर नियुक्ती असताना जरुड येथे काम कोणाच्या आदेशाने ते करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.स्वच्छतेचे तीन तेराहिवरा पहाडी शाळा परिसरात अस्वच्छता दिसून आली. तसेच पटसंख्येनुसार मुलांची उपस्थिती ५० टक्के होती. तर सात शिक्षक गैरहजर होते, असे या पाहणीत आढळले. 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र