शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी एकाच मंडपात पाच उपोषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:19 IST

शुक्र वारी शासकीय कार्यालयासमोर झालेल्या विविध आंदोलनानी शहर दणाणले. तहसील कार्यालयासमोर एका मंडपात पाच विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : शहरात शुक्र वारी शासकीय कार्यालयासमोर झालेल्या विविध आंदोलनानी शहर दणाणले. तहसील कार्यालयासमोर एका मंडपात पाच विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु झाले. कृषी कार्यालयासमोर महिला मजुरांनी ठिय्या आंदोलन केले, तर महावितरण कार्यालयासमोर गावंदरा येथील तरुणांनी उपोषण सुरु केले आहे. शुक्र वार हा शहरासाठी आंदोलन वार ठरला.धारुर शहरात २५ जानेवारी हा आंदोलनकर्त्यांचा वार ठरला. तहसील कार्यालयासमोर तर एका मंडपात पाच विषयावर आंदोलने झाली. यामध्ये अतिक्र मण काढण्याच्या मागणीसाठी सादेक इमानदार यांनी, तर दिलीप बिल्डकॉन चे कामामुळे घराला तडे गेले मदत मिळावी म्हणून चोरांबा येथील अशोक चव्हाण हे उपोषणास बसले आहेत. राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने ग्रामीण रु ग्नालयाची पाणीपुरवठा योजना तात्काळ करा या मागणीसाठी बबलू सावंत, सुनील गैबी हे अमरण उपोषणास बसले आहेत. रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंटी गायसमुद्रे हे बाजार समिती आवारातील कामाच्या चौकशी मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. वाघोली येथील एक शेतकरी आॅनलाईन शेती गायब झाली ती शोधून देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसला आहे.ही पाचही आंदोलने एकाच मंडपात सुरु आहेत. उपोषणकर्त्यांनी मंडप खचाखच भरला आहे. तहसीलसमोरील या आंदोलनाची चर्चा होती. शेतमजूर, युनियनने कृषी कार्यालयासमोर, कामाच्या मागणीसाठी कॉ. मनीषा करपे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. दोनशे ते अडीचशे महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर महावितरणसमोर गावंदरा येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरु करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. या वेगवेगळ्या आंदोलनामुळे शहरात मात्र चर्चेचा विषय होत आहे.

टॅग्स :agitationआंदोलनRepublic Dayप्रजासत्ताक दिनSocialसामाजिक