शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

पाच जिल्ह्यांसाठी आजपासून सैन्यभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:08 AM

भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बीड : भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत भरती कार्यक्रम राहील.ही भरती प्रक्रि या पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. शहरातील नगर रोडवरील म्हसोबा फाट्याजवळ फार्मसी कॉलेजच्या मागे सैनिकी शाळेत ही भरती प्रकिया होणार आहे.उमेदवारांनी दक्षता घ्यावीसैन्य भरतीसाठी येणाºया प्रत्येक पात्र उमेदवाराने त्याच्या निश्चित भरती दिनांक व वेळेत प्रत्यक्ष भरतीच्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे. नातेवाईकांना आणावयाचे टाळावे. सूचनांनुसार प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे आदी कागदपत्रे घेऊन यावीत, यामध्ये पूर्वी सैन्यभरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाले असल्यास त्याचा संपूर्ण तपशिलाचा लेखी मजकूर असावा. पात्र उमेदवाराने भरतीसाठी येताना सोबतच्या बॅगच्या ओळखीसाठी नावाचिन्ह लावावे. आपली आणलेली कागदपत्रे सुरिक्षतरित्या ठेवावी. लेखी व शारिरीक क्षमता परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, अपात्र ठरल्यास कोणत्याही प्रकारे विनंत्या करु नयेत त्याचा उपयोग होत नाही. सोईच्या दृष्टीने कपडे, पांघरुण, खाद्यपदार्थ सोबत आणावे.तीन पदांकरिता भरती प्रक्रियासैन्यदल भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने ६ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत नोंदणी केलेले उमेदवार पात्र आहेत.भरतीमध्ये बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहतील.सैन्यदलासाठी सैनिक (सामान्य वर्ग), सैनिक (तांत्रिक) आणि सैनिक (ट्रेडमैन) या पदांकरीता भरती केली जात आहे.कर्नल दीनानाथ सिंग, भारतीय सैन्यभरती कार्यालय, दक्षिण कमांड, पूणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होणार आहे.

टॅग्स :BeedबीडSoldierसैनिक