शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

‘फायर है मै’ चे फॅड; बीडमध्ये अवैध शस्त्र विक्री करणारे रॅकेट सक्रीय, ५० हजार ते दीडलाख रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:17 IST

पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे.

- संजय तिपालेबीड : पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही फायर है मै... हा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा डायलॉग भलताच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या बाजारातही फायर है मै...चीच हवा आहे. ५० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत अवैधरीत्या पिस्तूल सहज उपलब्ध करून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. बेकायदा शस्त्र विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. अवैध शस्त्रांच्या तस्करीचा मुद्दा देखील यामुळे चर्चेत आहे. राजकीय वादाला गोळीबारासारख्या घटनांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे. दरम्यान, बेकायदा शस्त्रांविरोधात पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने सध्या या बाजारात तेजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रांच्या बाजाराचा कानोसा घेतला असता जिल्ह्यात उत्तरप्रदेश, बिहार व मध्यप्रदेश येथून चोरीछुपे पिस्तूल येत असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यासाठी मुळापर्यंत जाऊन तपास करावा लागणार आहे.

जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्र शोध मोहिमेबाबत नियोजन केले आहे. लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.-सुनील लांजेवार, प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड.

जिल्हा कचेरीच्या दारात अन् हळदीच्या कार्यक्रमातही१) बीडमध्ये २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरसेवकाने गोळीबार केला होता. याला राजकीय वळण मिळाले व परस्परविरोधी गुन्हे नोंद झाले. हे प्रकरण राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही गाजले.

२) अंबाजोगाईत २६ मार्च रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी डीजेच्या तालावर मित्रांच्या खांद्यावर बसून नाचणाऱ्या नवरदेवाने हवेत फायर केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी बालाजी भास्कर चाटे या नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला.

परवाना पित्याच्या नावे, हवा करतोय पोरगापरवाना असलेल्यांनीच पिस्तूलचा वापर करणे आवश्यक आहे; मात्र पित्याच्या नावाने परवाना असलेल्या शस्त्राचा वापर नियमबाह्यपणे मुलगा करत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. अशा पद्धतीने परवाना नसताना शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

अवैध शस्त्रांवरील दोन वर्षांतील कारवाया....वर्ष -गुन्हे -आरोपी -जप्त मुद्देमाल२०२० -९ -१२ -९ गावठी कट्टे२०२१ -१० -१३ -१२ गावठी कट्टे

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी